नॅशनल गेम्स : जळगावच्या सोनल हटकरची पंचपदी नियुक्ती

  • By admin
  • February 8, 2025
  • 0
  • 68 Views
Spread the love

जळगाव : जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व केसीई सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी नल वाल्मिक हटकर हिची ३८ व्या नॅशनल गेम्स क्रीडा स्पर्धेसाठी बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.

सोनल हटकर हिची हिने यापूर्वी गोवा व गुजरात येथे नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स तसेच फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच मालदीव येथे आंतरराष्ट्रीय साबा वुमन्स डेव्हलपमेंट कॅम्पसाठी भारतातून चार महिला पंचांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात सोनलचा समावेश होता. 

सोनलच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, केसीई सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा राणे, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एल पी देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ दिनेश पाटील, जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, डाॅ श्रीकृष्ण बेलोरकर, डॉ रणजीत पाटील, प्रा यशवंत देसले, प्रा प्रवीण कोल्हे, प्रा प्रणव बेलोरकर, प्रा सुभाष वानखेडे, रवींद्र धर्माधिकारी आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *