
छत्रपती संभाजीनगर : श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल वेरूळ येथे क्रीडा भारती देवगिरी प्रांत मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुकुलातील सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक घेऊन सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगण्यात आले.
तसेच क्रीडा भारती देवगिरी प्रांत सहमंत्री डॉ मीनाक्षी मूलिया यांनी मुलांना सूर्यनमस्काराचे महत्त्व व शरीर संवर्धनसाठी शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी सूर्यनमस्कार महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. योग शिक्षिका व जलतरण प्रशिक्षक आणि क्रीडा भारती मातृशक्ती प्रमुख पद्मावती धारवाडकर यांनी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज तसेच संस्थेचे सचिव महंत १०८ सेवागिरीजी महाराज तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही यू बोरसे तसेच क्रीडा शिक्षक पी डी सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक तसेच पर्यवेक्षक विकी आदाने, गुरुजी वस्तीगृह अध्यक्ष सौरभ खैरे, जारवाल गुरुजी, बागडे गुरुजी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
त