
कोल्हापूर, पुणे विभाग संघाला विजेतेपद
परभणी : नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शालेय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत अमरावती विभाग, नाशिक विभाग संघांनी दुहेरी मुकुट पटकावला. कोल्हापूर विभाग आणि पुणे विभागाने विजेतेपद संपादन केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित राज्य शालेय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत १४ आणि १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अमरावती विभागाने विजेतेपद पटकावले. १९ वर्षांखालील मुले व १७ वर्षांखालील मुली अशा दोन गटात नाशिक विभागाने विजेतेपद मिळवून दुहेरी मुकुट संपादन केला. तसेच १४ वर्षांखालील मुलींच्या गटात कोल्हापूर आणि १९ वर्षांखालील मुलींच्या गटात पुणे विभाग विजेता ठरला.
बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, मुख्याध्यापक एम डब्ल्यू कल्याणकर, मुख्याध्यापिका एस आर कदम, राज्य सरचिटणीस गणेश माळवे, क्रीडा अधिकारी बालाजी शिर्षीकर, अशोक शिंदे, संयोजक विनोद जमदाडे, रमेश नांदेडकर, डॉ राहुल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. खेळाडूंना ट्रॉफी व मेडल मदने यांच्या वतीने देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश नांदेडकर यांनी केले. विनोद जमदाडे यांनी आभार मानले
या स्पर्धेत पंच प्रमुख म्हणून गणेश पाटील, निलेश माळवे यांनी काम पाहिले. तसेच पंच म्हणून राहुल पेटकर, विजय केंद्र, प्रज्वल पिपंळकर अभिषेक सोनवणे, सिद्धार्थ लिपने, साहिल जोगदंड, अभिजीत यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल
१४ वर्षांखालील मुले : १. अमरावती विभाग, २. छत्रपती संभाजीनगर विभाग, ३. पुणे विभाग. १४ वर्षांखालील मुली : १. कोल्हापूर विभाग, २. पुणे विभाग, ३. नाशिक विभाग.
१७ वर्षांखालील मुले : १. अमरावती विभाग, २. नाशिक विभाग, ३. कोल्हापूर विभाग. १७ वर्षांखालील मुली : १. नाशिक विभाग, २. मुंबई विभाग, ३. पुणे विभाग.
१९ वर्षांखालील मुले : १. नाशिक विभाग, २. अमरावती विभाग, ३. छत्रपती संभाजीनगर विभाग. १९ वर्षांखालील मुली : १. पुणे विभाग, २. मुंबई विभाग, ३. नाशिक विभाग.