
रावेर : कवयत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमा महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा अंतर्गत अग्नी वीर भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शनिवारी जोशपूर्ण वातावरणात समारोप झाला.
या शिबिरात महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांना अग्नी वीर भरतीपूर्व व पोलीस भरतीपूर्व असे सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण या शिबिरात देण्यात आले. त्यात ग्राउंड व पेपर तसेच ड्रिलमार्च संदर्भातील सराव आदी प्रशिक्षणाचा समावेश होता.
या शिबिरात प्रशिक्षक धनाजी नाना महाविद्यालय फैजपुर एनसीसी कॅडेट युनीटचे सीनियर ऑफिसर अजय चौधरी, ज्युनियर ऑफिसर ओम राजपूत, ऋषिकेश पाटील, कृष्णा भावसार यांनी प्रशिक्षण दिले.
या शिबिराचा समारोप अतिशय जोशपूर्ण वातावरणात झाला. या समारोप कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून धनाजी नाना महाविद्यालयाचे कॅप्टन डॉ राजेद्र राजपूत, बीएसएफ सेवानिवृत्त अधिकारी युवराज गाडे, उपप्राचार्य प्रा संदीप धापसे, डॉ ए एन सोनार, डॉ एस चिंचोरे, प्रा चतुर गाडे, प्रा नरेंद्र घुले, अग्नी वीर पूर्व प्रशिक्षण समन्व्यक डॉ उमेश पाटील, युवती सभा प्रमुख डॉ स्वाती राजकुंडल, डॉ निता जाधव आदी उपस्थित होते.
या प्रसंगी अनिल पाटील, राजेंद्र राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उमेश पाटील यांनी केले. चतुर गाडे यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी समन्वयक डॉ उमेश पाटील, युवती सभा प्रमुख डॉ स्वाती राजकुंडल व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा सत्यशिल धनले यांनी विशेष परिश्रम घेतले.