
पुणे : राज्यस्तरीय शालेय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत वसुंधरा नागरे, मिठी शर्मा, श्रीमयी गवाले, सुद्धांजली यादव, विवान खन्ना, साहिल वाघमारे व तेजस ताटे यांनी सलामीचे सामने जिंकून विजयी सलामी दिली.
उंड्री येथे महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीमध्ये राज्य शालेय स्क्वॉश चॅम्पियनशिप होत आहे. क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, पुणे जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव आनंद लाहोटी, अली पूनावाला, शिवाजी कोहली, वैशाली दराडे, अश्विनी तिरमके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत पंच म्हणून महेश काळदाते, सतीश पोद्दार, रोहिदास गाडेकर, गणेश तांबे, गोविंद सिंग, प्रियांका मंत्री, मानव माने, नितेश पोद्दार हे काम पाहत आहेत.
महत्त्वाचे निकाल
१४ वर्षांखालील मुली : वसुंधरा नागरे (लातूर) विजयी विरुद्ध जिज्ञासा मुरादे (अमरावती) ११-९, ११-३, मिठी शर्मा (पुणे) विजयी विरुद्ध प्रिया गायकवाड (लातूर) ११-३, ११-४, श्रीमयी गवाले (अमरावती) विजयी विरुद्ध शिवक्रांती गायकवाड, ११-६, ११-५.
१४ वर्षांखालील मुले : विवान खन्ना (पुणे) विजयी विरुद्ध यथार्थ सालोडकर (अमरावती) ११-९, ११-५, साहिल वाघमारे (मुंबई) विजयी विरुद्ध अरमान चौधरी (पुणे) ११-८, ११-९, तेजस ताटे (छत्रपती संभाजीनगर) विजयी विरुद्ध केतन तलवेकर (नागपूर) ११-५, ११-५.