
नागपूर : श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयातील दिव्यांग जलतरणपटू श्रेयस बहादुरे याने सायवस इंडिया ओपन स्वीमिंग नँशनल, चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत श्रेयस याने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात ०२.२५.२० सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. १०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात ०२.०५.९० सेकंद वेळेसह रौप्य पदकावर आपले नाव कोरले.
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे आयोजित १४व्या राज्य सागरी जलतरण स्पर्धत मालवण येथील बीच मध्ये १ किलोमीटर ००.१७.२९ सेकंद वेळेसह रुपेरी यश मिळविले. १६ व्या राज्यस्तरीय पँरा स्वीमिंग चँपियनशीप, ठाणे येथे झालेल्या १०० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक या प्रकारात २.५२.७३ सेकंद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
श्रेयस याचे या शानदार कामगिरीबद्दल त्याचे पालक,प्राचार्या डॉ प्रिया वंजारी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ संजय खळतकर यांनी अभिनंदन केले आहे.