
धुळे : धुळे जिल्हा अॅथलेटिक्स संघाची निवड चाचणी ११ व १२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सबज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी या निवड चाचणीतून धुळे जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. ही निवड चाचणी शहरातील वाडीभोकर रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येणार आहे. धुळे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने ११ व १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवड चाचणीतून निवड झालेले खेळाडू हे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा तालुका (पंढरपूर) येथे २२ व २३ फेब्रुवारी रोजी धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.ही निवड चाचणी ८, १०, १२, १४, १६ वर्षांखालील गटात व विविध प्रकारात होणार आहे.
या निवड चाचणीसाठी खेळाडूंनी जन्म दाखलेचा पुरावा सोबत आणावा. सहभागी होणाऱ्या खेळाडूला ५० रुपये प्रवेश फी भरावी लागेल. प्राविण्य प्राप्त प्रथम तीन खेळाडूंना मेडल व प्रशस्तीपत्र तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार देण्यात येणार आहे. या निवड चाचणीत खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन सचिव प्रा नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष हेमंत भदाणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रशिक्षक प्रमोद पाटील (७४९८४६८६६२), विश्वास पाटील, प्रशांत पाटील, सुखदेव महाले (९५७९४२३७१०), सुभाष पावरा (९८९०२९२२३०), अमोल पाटील (७७७६८११४८८), धनंजय सोनवणे (९९७०६०८०९०) यांच्याशी संपर्क करावा.