
छत्रपती संभाजीनगर : केरमांशाह (इराण) येथे ११ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या एशियन आईस स्टॉक स्पर्धेसाठी भारतीय संघात छत्रपती संभाजीनगरच्या प्रणव तारे याची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा मराठवाडा विभागातील प्रणव तारे हा पहिला खेळाडू ठरला आहे. भारतीय संघात निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र आईस स्टॉक असोसिएशनचे अध्यक्ष महेश राठोड व सचिव अजय सर्वोदय यांनी प्रणव तारे याचे अभिनंदन केले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.