राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी राकेश खैरनार, मयुरी गायके यांची नियुक्ती 

  • By admin
  • February 9, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : भारतीय शालेय क्रीडा महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील मुला-मुलींची राष्ट्रीय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालय येथे कार्यरत क्रीडा विभाग प्रमुख प्रा राकेश खैरनार यांची मुलांच्या संघाच्या व्यवस्थापकपदी आणि मयुरी गायके हिची मुलींच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

तत्पूर्वी, महाराष्ट्र मुला-मुलींच्या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर राकेश खैरनार व मयुरी गायके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. या निवडीबद्दल भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण, स्थानिक नियामक मंडळाचे सदस्य पंडितराव हर्षे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर, उपप्राचार्य एन जी गायकवाड, उपप्राचार्य सुरेश लिपाने, उपप्राचार्य विजय नलावडे, राज्य संघटना सहसचिव गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ फुलचंद सलामपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी डॉ उदय डोंगरे, दीपक रुईकर, गणेश बेटूदे, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, सागर रूपवते, संतोष आवचार, सचिन बोर्डे, प्रा मंगल शिंदे, प्रा कृष्णा दाभाडे, प्रा अमोल पगारे, प्रा शुभम गवळी, शेख  शफीक आदींनी अभिनंदन केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *