
छत्रपती संभाजीनगर : उत्तर प्रदेश सॉफ्टबॉल असोसिएशनतर्फे आयोजित १६व्या वरिष्ठ वेस्ट झोन सॉफ्टबॉल नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने चमकदार कामगिरी नोंदवत विजेतेपद पटकावले.
चौधरी चरणसिंग युनिव्हर्सिटी मेरठ येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने अंतिम सामन्यात मध्य प्रदेश महिला संघावर ५-१ होमरन फरकाने विजय प्राप्त करत विजेतेपद संपादन केले.
भारतीय ऑलिम्पिक पदक प्राप्त कुस्तीपटू अलका तोमर यांच्या हस्ते विजेत्यांना पदक आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ प्रवीण अनावकर, माजी सचिव एल आर मौर्य, श्रीकांत थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
अंतिम सामन्यात अंजली पवार हिने भेदक पीचींग करत सामना एकतर्फी करत महाराष्ट्र संघास विजय प्राप्त करून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. महाराष्ट्राची अंजली पवार हिला संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट पीचर म्हणून गौरवण्यात आले.

या शानदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गिरिश महाजन, सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, राज्य संघटनेचे सहसचिव गोकुळ तांदळे, प्रशांत जगताप, सुरजसिंग येवतीकर, रमाकांत बनसोडे, नितीन पाटील, रमेश भेंडेगिरी, किशोर चौधरी, दर्शना पंडित, अभय बिराज, गणेश बेटूदे, संतोष साळुंखे, मयुरी गायके, पूजा हणमंते आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्राचा विजेता महिला संघ
प्रीती कांबळे, आरती भालेराव, मोनाली नातू, ऐश्वर्या भास्करन, ईश्वरी शिंदे, उर्वशी सनेश्वर, माधुरी महाजन, मोहिनी कोळी, अंजली पवार, साक्षी येटाले, कल्याणी विधाळे, कृपली पाटील, रितू फ्रान्सिस, प्रांजल मुगले, फिजा सय्यद, नम्रता पवार, मोनाली कांबळे, ज्योती कांबळे.