देवगिरी महाविद्यालयातर्फे आयोजन : एमजीएम विद्यापीठ, पहाडे विधी कॉलेज सर्वोत्कृष्ट शहरी संघ
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक विनायकराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ मराठवाडा प्रसार मंडळ संचालित, देवगिरी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व, काव्यवाचन आणि वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. काव्यवाचन, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट संघाचे’ मानकरी अहिल्यानगर येथील ‘न्यू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कॉलेज नगर’ ठरले.
स्पर्धेचा वैयक्तिक निकाल
वादविवाद स्पर्धा : १. कोमल नरेंद्र शेलार (महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्मायालय, मालेगाव),२. तेजस्विनी केंद्रे (एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर), ३. रितिका शेळके (शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर). उत्तेजनार्थ : महेश उशिर (न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर) व स्वप्नील खरात (एमपी लॉ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर).
वक्तृत्व स्पर्धा : १. अभय आळशी (व्ही जी वझे महाविद्यालय, मुंबई), २. कोमल शेलार (महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगाव), ३. अदिती दराडे (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर). उत्तेजनार्थ : प्रशांत बेले (महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय, मालेगाव), तेजस्विनी केंद्रे (महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर) व स्वप्नील खरात (माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर).
या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण अॅड. संदीप ड़व्हळे, निलेश चव्हाण, पुनम वावरे, काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण डॉ. वीरा राठोड, गुंजन पाटील, गणेश घुले यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण द्वारकानाथ जोशी, अॅड. महेश मुठाळ, वर्षा देशमुख यांनी केले.
या स्पर्धेत स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, प्राचार्य आर. पी. पवार, प्राचार्य डॉ. सुभाष लहाने, डॉ. रामेश्वर गायकवाड, संयोजक डॉ. समिता जाधव, डॉ. गणेश मोहिते, प्रा. रवी पाटील, डॉ. जिजा शिंदे, डॉ. जिजा शिंदे यांनी पुढाकार घेतला होता.