सोलापूर येथे हनुमान दंड प्रशिक्षण शिबीर उत्साहात

  • By admin
  • February 10, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

पापय्या तालीम संघ व स्वरूपा योगा सेंटर यांचा उपक्रम

सोलापूर : पापय्या तालीम संघ व स्वरूपा योगा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जुनी मिल कम्पाऊंड येथील ऐतिहासिक पापय्या तालीम प्रांगणात एक दिवसीय मोफत हनुमान दंड प्रशिक्षण शिबीर उत्साही वातावरणात पार पडले.

या शिबिरात विविध स्तरातील शेकडो युवक व व्यायामपटूंनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन बजरंग बलीस नारळ वाढवून स्वरूपा योगा सेंटरचे प्रमुख योगा व मुद्रा तज्ञ जयंत पडसलगीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ व्यवहारे, विश्वस्त गणेश कुलकर्णी, प्रकाश सुरवसे, जयंत मोरे, गजानन लामनाने, शिवाजी चटके, संभाजी माळगे आदी उपस्थित होते.

शिबिराच्या समारोप प्रसंगी संस्थेच्या वतीने जयंत पडसलगीकर यांचा सत्कार तालमीचे ज्येष्ठ व्यायामपटू सुरेश जानकर व कुस्तीपटू राकेश  म्हेत्रे यांनी केला. यावेळी व्यायामपटू, साधक उपस्थित होते. प्रशिक्षणाचे प्रास्ताविक वस्ताद वसंत कुलकर्णी यांनी केले. जयंत मोरे यांनी आभार मानले.

‘हनुमान दंड’ हा भारतीय परंपरेचा व्यायाम
जयंत पडसलगीकर यांनी हनुमान दंड प्रशिक्षणाचे विविध प्रात्याक्षिके व फायदे आदीबाबत साधकांना प्रबोधन व मार्गदर्शन केले. ते म्हणाले,  हनुमान दंड हा भारतीय परंपरेचा व्यायाम आहे. संपूर्ण शरीराला व्यायाम देणारी क्रिया आहे. संपूर्ण शरीराला अद्भुत आपार शक्ती देते. स्नायू मजबूत होतात. शरीरातील सर्व अवयव हात पाय, खांदे, जॉईंट चांगले होतात. शरीराचे रक्ताभिसरण अतिशय चांगले होते. क्रोध व मानसिक ताण नाहीसा होतो. शरीर वज्रदेही होते. साहस, धैर्य अंगी येते. व्यायामपटुंनी दैनंदिन २०० ते ३०० हनुमान दंड घातले असता बॉडी मजबूत होते. हा व्यायाम फक्त भारतात आहे असे नाही तर विदेशात निरनिराळ्या जीममध्ये नियमित पुरूष व महिला दंडबैठका घालतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *