
यवतमाळ : स्टेअर्स महाराष्ट्र राज्य स्पर्धेमध्ये यवतमाळ येथील कराटे स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
ही स्पर्धा स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, नॅशनल स्पोर्ट्स प्रमोशन ऑर्गनायझेशन, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफियर्स अँड स्पोर्ट्स यांच्या विद्यमाने घेण्यात आली.
१० वर्षे, ३० किलो वजन गटामध्ये त्रिशा मंटू प्रसाद हिने कुमिते प्रकारात सुवर्णपदक व काता प्रकारात कांस्य पदक, १२ वर्षे, ३० किलो वजन गटामध्ये रिद्धी मंटू प्रसाद हिने कुमिते प्रकारात सुवर्णपदक व काता प्रकारात कांस्य पदक जिंकेल. १२ वर्षांखालील ५५ किलो वजन गटामध्ये आराध्या दीपक हिने कुमिते प्रकारात सुवर्णपदक व काता प्रकारात कांस्य पदक पटकावले. १६ वर्षांखालील ६५ किलो वरील वजन गटामध्ये दिव्या दीपक हिने कुमिते प्रकारात सुवर्णपदक व काता प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले.
ही स्पर्धा विरार वेस्ट, मुंबई येथे घेण्यात आली होती. स्काई इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक राजेंद्र डांगे, यशवंत डांगे, मुख्याध्यापक सोमेन चॅटर्जी, मार्गदर्शक व प्रशिक्षक कराटे स्पोर्ट्स अकॅडमी यवतमाळचे संथापक अध्यक्ष आणि स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा समिती तांत्रिक निर्देशक सुजित पत्रे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार १६ फेब्रुवारी रोजी कराटे स्पोर्ट्स अकॅडमी, स्काई इंटरनॅशनल स्कूल, साने गुरुजी नगर, वाघापूर रॉड, लोहारा येथे होणार आहे.