
नंदुरबार : नंदुरबार येथील रुपेश महाजन याची उदयपूर येथे होत असलेल्या पहिल्या राष्ट्रीय लॅक्रोस स्पर्धेत निवड झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातून ऑलिम्पिक क्रीडा प्रकारात समावेश झालेल्या या लॅक्रोस खेळात खेळणारा रुपेश महाजन प्रथम खेळाडू ठरला आहे.
लॅक्रोस फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व राजस्थान लॅक्रोस असोसिएशनच्या वतीने पहिल्या राष्ट्रीय लॅक्रोस स्पर्धेचे आयोजन उदयपूर येथे करण्यात आले असून या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य लॅक्रोस असोसिएशनचा संघ सहभागी झाला आहे. या महाराष्ट्र राज्याच्या संघात नंदुरबार जिल्हा लेकरू असोसिएशनचा खेळाडू रुपेश कैलास महाजन याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लॅक्रोस हा एक आंतरराष्ट्रीय खेळ आहे. ज्याचा भारतात दीर्घ इतिहास आहे, जरी तो व्यापकपणे पसरलेला नाही. १८०० च्या दशकात ब्रिटिश सैनिकांनी देशात हा खेळ सुरुवातीला भारतात आणला होता. रुपेश महाजनच्या निवडीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा संघटक पुष्पेंद्र रघुवंशी, क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, सचिव मीनल वळवी, भरत चौधरी यांनी अभिनंदन केले आहे. रुपेश महाजन याला डॉ मयुर ठाकरे, भरत चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.