
बुलढाणा : नांदेड येथे बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात कार्यरत असलेले क्रीडा शिक्षक गणेश पेरे यांचा ‘समाज गॏरव’ म्हणून सत्कार करण्यात आला.
परदेशी कुंभार समाज व कुंभदीप स्तंभ समाजोन्नती बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य गुणवंतांचा सन्मान सोहळा नांदेड येथे लोकमान्य मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात क्रीडा शिक्षक गणेश पेरे यांना क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समाज गौरव पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात नागपूरचे उपजिल्हाधिकारी सुरेश बगळे, यवतमाळचे न्यायाधीश मनोज बनचरे, अकोटचे उपजिल्हाधिकारी मनोज लोनारकर आणि समाज अध्यक्ष सुभाष टेटवार, रवींद्र टाके यांच्या हस्ते गणेश पेरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोज बनचरे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
मिक्स बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व इंडियन मिक्स बॉक्सिंग फेडरेशनचे संस्थापक महासचिव राकेश म्हसकर व महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत मोहिते व मिक्स बॉक्सिंग असोसिएशन नांदेड जिल्हा सचिव विनोद दाढे यांचे समाजाने आभार व्यक्त केले आहेत.