
छत्रपती संभाजीनगर : गरवारे कम्युनिटी सेंटर आणि जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत भूमिका वाघले, कौस्तुभ वाघ, यश गायके यांनी विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील विजेते खेळाडू हे ११, १३ वर्षांखालील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतवणे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव हेमेंद्र पटेल, अजय पटेल यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. पंच म्हणून विलास राजपूत, अमित देशमुख यांनी काम पाहिले. या स्पर्धेत लक्षवेधक कामगिरी नोंदवल्याबद्दल प्रियल शिखरे, कायरा मालानी, श्रेया शेळके, अक्षरा काले, नीव भन्साळी, विहान दारकुंडे, वंश देसरडा यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.
अंतिम निकाल
१३ वर्षांखालील मुलांचा गट : १. कौस्तुभ वाघ, २. आयुष कोटेचा, ३. आर्यन सोनवणे, ४. स्वराज बक्षी.
१३ वर्षांखालील मुलींचा गट : १. भूमिका वाघले, २. भक्ती गवळी, ३. लब्धी साकला, ४. काव्या वाघचौरे.
११ वर्षांखालील मुलांचा गट : १. यश गायके, २. मोहित पाटील, ३. ऋतुराज सावरे, ४. कृष्णा ठोंबरे.
११ वर्षांखालील मुलींचा गट : १. भूमिका वाघले, २. स्वरा लढ्ढा, ३. भक्ती गवळी, ४. स्वरा काळे.