
राज्यस्तरीय शालेय स्क्वॉश स्पर्धा
पुणे : राज्यस्तरीय शालेय स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत विवान खन्ना, वसुंधरा नांगरे, आदित्य घोडके आणि इशा श्रीवास्तव यांनी आपल्या गटात विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेच्या उंड्री येथील स्क्वॉश अकादमी येथे राज्य शालेय स्क्वॉश स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना न्यायाधीश एस एम सय्यद, महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, माजी क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, पुणे जिल्हा स्क्वॉश रॅकेट असोसिएशनचे सचिव आनंद लाहोटी, शिवाजी कोळी, वैशाली दरवडे, सागर हरपळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत पंच म्हणून सतीश पोद्दार, रोहिदास गाडेकर, प्रियंका मंत्री, कल्याण गाडेकर, महेश काळदाते, गणेश तांबे, गोविंद सिंग, नितेश पोद्दार, मानव माने यांनी काम पाहिले.
अंतिम निकाल
१४ वर्षांखालील मुले : १. विवान खन्ना (पुणे), २. विनय शिंदे (लातूर), ३. साहू पुंणळे (नाशिक), ४. पृथ्वीराज भस्मे (कोल्हापूर), ५. विवेक शिंदे (लातूर).
१४ वर्षांखालील मुली : १. वसुंधरा नांगरे (लातूर), ३. आराधना ताटे (छत्रपती संभाजीनगर), ३. सुनिया वाघमारे (मुंबई), ४. रऐशा नाईक (मुंबई), ५. स्वरा साठे (छत्रपती संभाजीनगर).
१७ वर्षांखालील मुली : १. ईशा श्रीवास्तव (पुणे), २. अश्मिरा बेग (छत्रपती संभाजीनगर), ३. अरिका मिश्रा (पुणे), ४. अनुष्का वाणी (नाशिक), ५. राधिका इजाते (छत्रपती संभाजीनगर).
१७ वर्षांखालील मुले : १. आदित्य घोडके (छत्रपती संभाजीनगर), २. इंद्रांश बडगुजर (अमरावती), ३. अगस्त्य राजपूत (पुणे), ४. नैतिक चंद (मुंबई), ५. अलय अग्रवाल (पुणे).