
सोलापूर : पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या तायकॉन फेडरेशन ऑफ एशिया, तायकॉन फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायकॉन फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली आशियाई तायकोन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये भारत, दक्षिण कोरिया, नेपाळ, भूतान, थायलंड, बांगलादेश आणि श्रीलंका या देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेमध्ये संत सावता माळी विद्यालय अरणचा व आरोही स्पोर्ट क्लबचा खेळाडू रुद्र राजेंद्र पवार याने ४५ किलोखालील वजन गटामध्ये व १७ वर्षांखालील वयोगटात रौप्य पदक पटकावले. तसेच मयूर दीपक गलांडे याने ५५ किलोखालील वजन गटात व १७ वर्षांखालील वयोगटात कांस्य पदक पटकावले. या कामगिरीबद्दल जिल्हा भरातून दोन्ही खेळाडूंचे कौतुक होत आहे.
या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, प्रशालेचे प्राचार्य मोरे, फरड, संजय शिंदे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना श्रीकांत पुजारी, रामचंद्र करण वर, ओंकार वागज, बिरुदेव पुजारी, सिद्धेश्वर रणदिवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.