
नागपूर : वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा आणि लोक शिक्षण संस्था वरोरा तसेच सध्या नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक या पदावर कार्यरत असलेले निखिल बोबडे यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाद्वारे नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेच्या निकालामध्ये तालुका क्रीडा अधिकारी पदावर निवड झाली आहे.
निखिल बोबडे यांनी आपल्या एमपीएससी परीक्षेतील या यशाचे श्रेय मार्गदर्शन करणारे क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके तसेच सर्वतोपरी मदत करणारे मावशी-काका निला प्रशांत भागवतकर, वीणा शंकर वैद्य, आजी अंजनाबाई चिकटे यांना दिले. अभ्यासातील सातत्य, वरिष्ठ अधिकारी व सहकारी वर्गाचे मार्गदर्शन, तसेच आई-वडील, मित्र परिवार यांचा पाठिंबा यामुळे हे यश प्राप्त करू शकलो अशा भावना निखिल बोबडे यांनी व्यक्त केल्या.
निखिल बोबडे यांचे या निवडीबद्दल वरोडा लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सचिव विश्वनाथ जोशी, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशनचे गजानन जिवतोडे, सुनील बांगडे, चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, गडचांदूर शिक्षण मंडळाचे सचिव धनंजय गोरे, शरद जोगी व इतर मान्यवर मंडळींनी अभिनंदन केले. निखिल बोबडे यांचे एमपीएससी परीक्षेततील यश जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी व खेळाडूंना प्रेरित करीत आहे.