
मुंबई : सारस्वत बँक पुरस्कृत १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटाच्या उपउपांत्य फेरीत शानदार कामगिरी करत मुंबईच्या महम्मद घुफ्रान आणि पुण्याच्या सागर वाघमारेने उपांत्य फेरीत धडक मारली.
मुंबईच्या घुफ्रानने पुण्याच्या प्रकाश गायकवाडला २५-०, २५-१७ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून सहज विजय मिळवला. दुसऱ्या उपउपांत्य सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने मुंबईच्या संजय मांडेवर २५-१३, २३-९ असा सहज विजय मिळवला.
महिला गटातही रोमांचक सामने पाहायला मिळाले. रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने चुरशीच्या लढतीत मुंबईच्या समिधा जाधवला ८-१५, २२-९, २५-६ असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली.
पुरुष एकेरी उपउपांत्य फेरी निकाल
महम्मद घुफ्रान (मुंबई) विजयी विरुद्ध प्रकाश गायकवाड (पुणे) २५-०, २५-१७, सागर वाघमारे (पुणे) विजयी विरुद्ध संजय मांडे (मुंबई) २५-१३, २३-९, संदीप देवरुखकर (मुंबई) विजयी विरुद्ध प्रफुल मोरे (मुंबई) १९-८, २५-१२.
महिला एकेरी उपउपांत्य फेरी निकाल
आकांक्षा कदम (रत्नागिरी) विजयी विरुद्ध समिधा जाधव (मुंबई) ८-१५, २२-९, २५-६, श्रुती सोनावणे (पालघर) विजयी विरुद्ध पुष्कर्णी भट्टड (पुणे) १०-२५, २५-१, २४-१, काजल कुमारी (मुंबई) विजयी विरुद्ध मिताली पाठक (मुंबई) १५-१४, २५-८.