
नऊ विकेट घेणारा शार्दुल ठाकूर सामनावीर
कोलकाता : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई संघाने हरियाणा संघाचा १५२ धावांनी पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने सामनावीर किताब संपादन केला.
बाद फेरीच्या या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे याने दुसऱ्या डावात १०८ धावांची खेळी करत संघाला भक्कम स्थिती मिळवून दिली. या सामन्यात मुंबई संघाकडून शम्स मुलाणी, तनुश कोटियन, शार्दुल ठाकूर आणि सूर्यकुमार यादव यांनी भन्नाट कामगिरी नोंदवत संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. अजिंक्य रहाणे याने २०० वा प्रथम श्रेणीचा सामना करताना शतक झळकावत सामना संस्मरणीय बनवला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई : पहिला डाव : ८८.२ षटकात सर्वबाद ३१५ (तनुश कोटियन ९७, शम्स मुलाणी ९१, अजिंक्य रहाणे ३१, शिवम दुबे २८, अंशुल कंबोज ३-७१, सुमित कुमार ३-८१).
हरियाणा : पहिला डाव : ८४.५ षटकात सर्वबाद ३०१ (अंकित कुमार १३६, लक्ष्य दलाल ३४, यश वर्धन दलाल ३६, शार्दुल ठाकूर ६-५८, शम्स मुलाणी २-६८, तनुश कोटियन २-५७).
मुंबई : दुसरा डाव : ८५.३ षटकात सर्वबाद ३३९ (अजिंक्य रहाणे १०८, सूर्यकुमार यादव ७०, शिवम दुबे ४८, आयुष म्हात्रे ३१, सिद्धेश लाड ४३, अनुज ठकराल ४-७०, अंशुल कंबोज २-५७, सुमित कुमार २-६५, जयंत यादव २-६९).
हरियाणा : दुसरा डाव : ५७.३ षटकात सर्वबाद २०१ (लक्ष्य दलाल ६४, सुमित कुमार ६२, जयंत यादव २७, शार्दुल ठाकूर ३-२६, रॉयस्टन डायस ५-३९, तनुश कोटियन २-१५). सामनावीर : शार्दुल ठाकूर.