माऊंटन बायकिंग स्पर्धेत प्रणिताला सुवर्ण, ऋतिकाला रौप्य

  • By admin
  • February 11, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

सातताल : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील माऊंटन बायकिंगमधील एमटीबी सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिता सोमण हिने लागोपाठ सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. याच प्रकारात ऋतिका गायकवाडनेरूपेरी यश संपादन केले.

निसर्गरम्य उत्तराखंडच्या सातताल डोंगरदर्‍यातील खडकाळ मार्गावरील सात फेर्‍यांची शर्यत प्रणिता सोमणने एक तास २२ मिनिटे १०.८१८ सेकंदात पूर्ण केली. तिची सहकारी व नाशिकची खेळाडू ऋतिका गायकवाड हिने कांस्यपदक जिंकताना हेच अंतर एक तास २७ मिनिटे ५.६२३ सेकंदात पार केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच माउंटन बाईकिंग या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. प्रणिता हिने क्रॉस कंट्री टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. टाईम ट्रायल मधील अव्वल यशामुळे आज तिने अतिशय आत्मविश्वासाने ही शर्यत जिंकली. टाईम ट्रायल शर्यतीप्रमाणे आजही तिला कर्नाटकची आंतरराष्ट्रीय सायकलपटू स्टार नरझरी हिचे आव्हान होते. मात्र, प्रणिता हिने तिला कसे मागे ठेवायचे याचे योग्य नियोजन करून सलग दुसर्‍या सुवर्णयशाला गवसणी घातली.

टाईम ट्रायलमध्ये काल सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला होता. आज त्याचा फायदा घेत अन्य स्पर्धकांवर मात करू माझे सहकारी ऋतिका हिला कास्यपदक मिळाल्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे. असे प्रणिता हिने सांगितले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पदक मिळवण्याचे माझे ध्येय साकार झाल्यामुळे मला खूपच समाधान झाले आहे. त्यातही प्रणिता या माझ्या सहकारी खेळाडू बरोबर पदकाच्या व्यासपीठावर उभे राहण्याची संधी मिळाली याचा आनंद मोठा असल्याचे ऋतिकाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *