
शिवराज शेळकेचे सामन्यात १२ विकेट, सचिन लव्हेराची शानदार फलंदाजी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एमसीए सीनियर पुरुष निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल झोन संघाने परभणी संघावर १०७ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. शिवराज शेळके याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

उरवडे क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. या सामन्यात जयदीप भराडे (७५), गौरव शिंदे (५५), मोहित चौधरी (४१), सेंट्रल झोन संघाचा कर्णधार सचिन लव्हेरा (४०) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत शिवराज शेळके याने (८-२३) व (४-३८) सामन्यात १२ विकेट घेऊन संघाला मोठा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. सौरभ शिंदे याने ६८ धावांत पाच विकेट घेतल्या. या विजयाबद्दल अपेक्स कौन्सिलचे चेअरमन सचिन मुळे, राजू काणे व कर्मवीर लव्हेरा यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
संक्षिप्त धावफलक : सेंट्रल झोन संघ : पहिला डाव : ३२ षटकात सर्वबाद १४३ (सम्राट राज १९, मोहित चौधरी ८, सचिन लव्हेरा ४०, मेरवान यादव ३०, शिवराज शेळके १४, सौरभ राठोड नाबाद ९, मोहम्मद युसूफ ३-२१, जयदीप भराडे २-३५, शुभम कटारे २-२२).
परभणी संघ : पहिला डाव : ४२ षटकात सर्वबाद १७३ (इंद्रजीत शिंदे ११, शुभम कटारे १२, सौरभ शिंदे ४०, देवेंद्र पाटील १४, जयदीप भराडे ७५, शिवराज शेळके ४-३८, गौरव शिंदे २-२०, सौरभ राठोड ३-२७, निखिल पवार १-७).
सेंट्रल झोन : दुसरा डाव : ४८.५ षटकात सर्वबाद २१३ (सम्राट राज १३, मोहित चौधरी ४१, सचिन लव्हेरा ३६, गौरव शिंदे ५५, मयंक लोढा नाबाद ९, सौरभ शिंदे ५-६८, शुभम कटारे ३-२८, जयदीप भराडे १-४५, आदित्य सिंग १-२७).
परभणी संघ : दुसरा डाव : १७.४ षटकात सर्वबाद ७६ (सागर गायकवाड १७, इंद्रजीत शिंदे ८, शुभम कटारे १४, देवेंद्र पाटील ९, सौरभ शिंदे ९, जयदीप भराडे १८, शिवराज शेळके ८-२३, यादव मेरवान २-३२).