आयएसपीएल, मुंबई बंदर, मुंबई महानगरपालिकेचे सलग विजय

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 8 Views
Spread the love

राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी

मुंबई : प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत आयएसपीएल, मुंबई बंदर आणि मुंबई महानगरपालिकेने सलग विजयासह बाद फेरीत धडक मारली तर आयएसपीएल, रुपाली ज्वेलर्सने कडवी लढत देत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कबड्डीप्रेमींना कबड्डीचा दमदार आणि जोरदार खेळ पाहाण्याचे भाग्य लाभले होते. मात्र दुसर्‍या दिवशी मैदानातून थरार गायब झाला होता. मुंबई महानगर पालिकेने ठाणे महानगर पालिकेला हरवले होते तर हिंदुजा रुग्णालयाचा ३८-२२ असा सहज पराभव करत सलग दुसर्‍या विजयासह बाद फेरीत स्थान मिळवले. मुंबई पालिकेच्या विजयात राहुल सवर आणि अल्केश चव्हाण यांनी जोरदार खेळ केला. मुंबई बंदरनेही बाद फेरी गाठताना मुंबई पोस्टलचे आव्हान ४०-३३ असे मोडीत काढले. मुंबई बंदरकडे हाफ टाइमला १६-१५ अशी एका धावेची आघाडी होती. मात्र दुसर्‍या डावात कृष्णा शिंदे आणि चेतन पारधीने वेगवान खेळ करत बंदराला विजयाच्या किनार्‍यावर नेले.

स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून ज्याच्या खेळाकडे पाहिले जाते त्या आयएसपीएल (युवा पलटण) संघाने युनियन बँकेचा ३६-१९ असा धुव्वा उडवला. आयएसपीएलने मध्यंतरापूर्वीच १९-१० अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता तर उत्तरार्धात त्यांनी तोच खेळ कायम राखत युनियन बँक संघाला डोकेच वर काढू दिले नाही. त्यानंतर दुसर्‍या लढतीत त्यांनी त्रिमूर्ती एंटरप्राइजेसचा ३९-१५ असा धुव्वा उडवत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अन्य एका लढतीत रायगडच्या मिडलाईन अ‍ॅकॅडमीने रुपाली ज्वलेर्सविरुद्ध २४-२० अशी आघाडी मिळवली होती. मात्र मध्यंतरानंतर रुपाली ज्वेलर्सने मिडलाइनच्या चढाईबहाद्दरांच्या एकापेक्षा एक पकडी करत सामन्यात कमबॅक केले आणि मिडलाइनचे कंबरडे मोडून काढले. रुपाली ज्वेलर्सने हा सामना ४८-४० असा जिंकत आपले स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मिडलाईनने आपल्या दुसर्‍या सामन्यात न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचा ४०-३१ असा पराभव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *