शिवाजी पार्क जिमखाना कॅरम स्पर्धेत हरेश्वर बेतवंशी, काजल कुमारी विजेते

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

मुंबई : शिवाजी पार्क जिमखाना आयोजित आणि सारस्वत बँक पुरस्कृत १६व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या हरेश्वर बेतवंशीने अप्रतिम खेळ करत पुण्याच्या अनुभवी सागर वाघमारेचा सरळ दोन सेटमध्ये २५-८, २२-१४ असा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले. स्पर्धेत त्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.

महिला गटात अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या काजल कुमारीने पालघरच्या श्रुती सोनावनेला २५-४, २५-९ असे सहज पराभूत करून विजेतेपदावर आपली मोहर उमटवली. पुरुष विजेत्या हरेश्वर बेतवंशीला रोख २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले, तर महिलांच्या विजेत्या काजल कुमारीने ८ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

पुरुष गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने संदीप देवरूखकरवर २५-७, २५-१० असा विजय मिळवला. तर महिलांच्या गटात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने ठाण्याच्या रिंकी कुमारीला १७-१४, २५-४ असे पराभूत करून तिसरा क्रमांक पटकावला.

पारितोषिक वितरण सोहळा
स्पर्धेतील विजेत्यांना शिवाजी पार्क ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि चषक प्रदान करण्यात आले. यावेळी जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर, सहसचिव सुनील रामचंद्रन, इनडोअर सचिव सुनील समेळ, ट्रस्टी लता देसाई, महेंद्र ठाकूर, प्रकाश नायक, मिलिंद सबनीस, कॅरम विभाग सचिव अजय पाटणकर, खजिनदार विलास सोमण तसेच राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मंजूर अहमद खान, सचिव अरुण केदार, सहसचिव केतन चिखले आणि योगेश फणसळकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *