शंकरवाडीत युवा साई चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

  • By admin
  • February 12, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

मुंबई : युवा साई प्रतिष्ठान आणि युवकवलय स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त प्रयत्नाने तसेच ॐ साई राम संघटना आणि साई मोरया ग्रुप यांच्या सहकार्याने युवा साई चषक २०२५ अंतर्गत प्रथम श्रेणी पुरुष गट आणि कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा १५ व १६ फेब्रुवारी रोजी शंकरवाडी, जोगेश्वरी येथे पार पडणार आहे.

या स्पर्धेत कुमार गटाच्या १८ संघांचा आणि प्रथम श्रेणी पुरुष गटाच्या ८ संघांचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत मुंबईतील अनेक नामांकित संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये जॉली स्पोर्ट्स क्लब, जोगेश्वरी, संघर्ष स्पोर्ट्स क्लब, मालाड, पार्ले स्पोर्ट्स क्लब, पार्ले, गोकुळवन क्रीडा मंडळ, गोरेगाव, नव महाराष्ट्र मंडळ, बोरिवली, श्रीकृष्ण क्रीडा मंडळ, अंधेरी, अभिनव मंडळ या संघांचा समावेश आहे.

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. तसेच, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई करणाऱ्या खेळाडूंना विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. कबड्डीप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरणार असून, जोगेश्वरी परिसरात दोन दिवस कबड्डीचा रोमांचक थरार पाहायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *