
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत नाशिक येथे २१व्या ज्युनियर व सीनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र जम्परोप असोसिएशन आणि नाशिक जिल्हा जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रसंगी जम्परोप फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस शहेजाद खान, खजिनदार अशोक दुधारे, महाराष्ट्र जम्परोप संघटनेचे अध्यक्ष विष्णू भंगाळे, आनंद खरे, राहुल देशमुख, रुची कुंभारकर आणि योगेश गाडेकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात विक्रम दुधारे, डॉ पांडुरंग रणमाळ, दीपक निकम, कैलास कनखरे, प्रशांत पारगावकर, उमेश खंदारकर, शिवकुमार कोळे, स्नेहल भगत, अमन वर्मा, रामा हटकर, सुवर्णा काकडे, वर्षा काळे, लता पाचपोर, विदेश मोरे, तन्मय कर्णीक, नामदेव रणवीर, संजय सातारकर आदींचा समावेश आहे.