
विभागीय क्रीडा संकुलात गुरुवारपासून स्पर्धा रंगणार
छत्रपती संभाजीनगर : भारतीय शालेय महासंघाद्वारे आयोजित महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य व छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल यांच्या तांत्रिक सहकार्याने ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल १४ वर्षांखालील मुले व मुली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा १६ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबल स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण तयारी झाली असून सुसज्ज अशी चार आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदानी तयार करण्यात आली आहेत. या स्पर्धेत भारतामधून ३४ राज्यांचे जवळपास ७०० ते ७५० खेळाडू व अधिकारी सहभागी होत आहेत.
राष्ट्रीय स्पर्धा मुले व मुली अशा स्वतंत्र गटात साखळी व नंतर बाद पद्धतीने होणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात प्रथमच या स्पर्धेत महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर येथील आर्य चाणक्य शाळेचा मुलांचा संघ विद्याभारतीकडून पात्र झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे दोन संघ या स्पर्धेत पदकासाठी लढणार आहेत हे विशेष.
स्पर्धा आयोजना दरम्यान सहभागी खेळाडूंची भोजन व्यवस्था त्या-त्या राज्यांनी स्वतः करावयाची असते. आयोजकांनी स्पर्धेच्या आयोजन व निवास व्यवस्था करावयाची असते. आवश्यक पात्र पंच व अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून भारतीय शालेय महासंघाकडून निरीक्षक व तांत्रिक समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे एकूण २१ खेळाडू या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून ४ मुले, १ मुलगी असे एकूण ५ तर विद्याभरती संघाकडून (आर्य चाणक्य १६) असे २१ खेळाडू प्रतिनिधित्व आहेत.
विभागीय क्रीडा संकुल समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांच्यासह राज्य व जिल्हा संघटनेचे पदाधिकारी व सदस्य महाराष्ट्र संघाच्या सुवर्ण पदक प्राप्तीसाठी विशेष प्रयत्न करत आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी सांगितले.
या दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, क्रीडा अधिकारी लता लोंढे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, क्रीडा अधिकारी राम मायदे, क्रीडा अधिकारी खंडूराव यादव, वरिष्ठ लेखा लिपीक सदानंद सवळे, गणेश बेटूदे, राकेश खैरनार, रफिक जमादार, संतोष आवाचार, सचिन बोर्डे, भीमा मोरे, मयुरी गायके व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र मुलांचा संघ
धर्मवीर गोंडगे, धनंजय गोंडगे, ओमकेश भुसारे, नैतिक रताळे, यश कदम, सर्वेश शेळके, यशराज मदने, रचित पाटील, रितेश साळुंखे, नकुल माने, समर्थ पाटील, शंतनू धायगुडे, सोहम राऊत, स्वरूप इंगोले, कार्तिक भालेराव, प्रणव झांबरे. प्रशिक्षक : मंगेश गुडदे, व्यवस्थापक : राकेश खैरनार.
महाराष्ट्र मुलींचा संघ
स्वराली देवकर, अस्मि राऊत, तनया पवार, मृण्मयी पवार, मनाली खोत, तनिष्का वाघ, आभा संग्रामे, जागृती शहारे, अक्षरा सोनवणे, झोया शेख, राजविका कोलते, अनन्या गायकवाड, पूजा तिडके, सुशीता सराफ, कल्याणी शिंदे. प्रशिक्षक : मयुरी गायके, व्यवस्थापक : क्रीडा अधिकारी लता लोंढे.