
प्रथम वर्षाचा १०० टक्के तर कॉलेजचा ९५.१८ टक्के निकाल
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या हिवाळी परीक्षा २०२४ चे निकाल नुकतेच घोषित झाले. यामध्ये कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. मागील १५ वर्षांपासूनची यशाची परंपरा कायम राखली आहे.

यावर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील प्रल्हाद चापे ९३.८९, द्वितीय वर्षामधील क्रिश मेहता ९४.१२ व प्रथम वर्षातील प्रताप मगर ८९.२९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील माधवी उदावंत ९०.८, द्वितीय वर्षामधील आदित्य हिवराळे ८५.५३, प्रथम वर्षातील निवृत्ती वैद्य ८५.६५ गुण मिळवून उत्तीर्ण झाले.


इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील ओमकार निल ८६.६, द्वितीय वर्षामधील गायत्री शिनगारे ८८.५९ व प्रथम वर्षातील अनुजा जाधव ८५.७७ तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरींग विभागातून अंतिम वर्षातील धनश्री कुरे ८८.८४, द्वितीय वर्षामधील भक्ती भंडारे ९०.६७ व प्रथम वर्षातील पायल साबळे ८६.५९, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून अंतिम वर्षातील मीनाक्षी राठोड ८८.८६, द्वितीय वर्षामधील शेख मोहम्मद बिलाल ८९.८९ व प्रथम वर्षातील वैभव बनकर ८३. ८८ तसेच आर्टीफिसिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातून अंतिम वर्षातील रिया काकडे ९०.२२, प्रगती डगळे ९०.२२, द्वितीय वर्षामधील हरिओम शेंगुळे ९३.७७ व प्रथम वर्षातील स्वस्तिश्री स्वर्णकार ८८.९४, यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला. तसेच अनेक विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
या यशाचे गमक म्हणजे योग्य नियोजन, प्रभावी शिकवणी, पारदर्शी मूल्यमापन व विध्यार्थीभिमुख उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होय. याचाच परिणाम म्हणून कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईतर्फे उत्कृष्ट मानांकन देऊन गौरव करण्यात आला. तसेच नुकताच कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकला नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडिटेशन (एनबीए) चे राष्ट्रीय मानांकन मिळाले असून आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. भविष्यात सुद्धा हीच परंपरा कायम ठेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान देऊन सक्षम व कौशल्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करू असे प्राचार्य डॉ. शशिकांत डिकले यांनी सांगितले.


या घवघवीत यशाबद्दल छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ शशिकांत डिकले, उपप्राचार्य प्रा चंद्रशेखर राहणे, प्रा कैलास तिडके, प्रा अनिकेत सोनवणे, प्रा महेश मोरे, प्रा रुपाली पोफळे, प्रा माधव नरंगले, प्रा संदीप मदन, प्रा सोनल बोराखडे, प्रा सागर आव्हाळे, प्रा गिरीश सहाणे, प्रा धनंजय लांब, प्रा भारत धनवडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.