
सेलू : भारतीय लॅक्रॉस फेडरेशन ऑफ इंडिया व राज्यस्थान लॅक्रॉस असोसिएशन वतीने आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय सीनियर लॅक्रॉस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कांस्य पदक पटकावले.
उदयपूर (राजस्थान) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सब ज्युनिअर महाराष्ट्र राज्य मुलांच्या संघाने कांस्य पदक पटकावले. या संघात कर्णधार गोपीनाथ कंठाळे, निनाद चोघुले, वेदांत मगर, करण गोरे, सागर आडणे, ओम नेमाडे, कार्तिक खिस्ते, अभय वाघ, आदित्य खिस्ते, प्रणव घोडके, निशांत सोनवणे, दिशांत राऊत, वरद मगर, सिद्धार्थ बच्छाव, अजय चव्हाण, साईनाथ दराडे, अर्णव वाव्हळे, साहिल वाव्हळे, आदित्य महाशिवदळे, ओम काकडे या खेळाडूंचा समावेश होता.
या घवघवीत यशाबद्दल महाराष्ट्र लॅक्रॉस असोसिएशन अध्यक्ष सुमेधा ठाकूर, महाराष्ट्राचे सचिव मोहम्मद बाबर, परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष कठाळे, परभणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणेश माळवे, सचिव प्रशांत नाईक, राजू कोळी, विशाल पवार, तांत्रिक समिती प्रमुख जबाक, संतोष शिंदे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या संघाला प्रशिक्षक राहुल घाडगे, प्रशिक्षक कुणाल चव्हाण, व्यवस्थापक सत्यम बरकुले यांचे मार्गदर्शन लाभले.