
लासलगाव (जि. नाशिक) : निफाड तालुक्यातील लासलगाव येथील श्री महावीर कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील आब्बड, सेक्रेटरी महावीर चोपडा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा विकास शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रीडा संचालक प्रा रामेश्वर शिंदे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा एजाज शेख आणि विद्यार्थी विकास मंडळ विभाग अधिकारी प्रा समाधान शिरसाठ, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा पंकज दुर्वे, तसेच प्रा अर्चना होळकर, प्रा रोहित पठारे, अभिजित साखरे, प्रसाद इंगळे, धनंजय निकम, सागर नेवगे यांच्या उपस्थितीत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रीडा संचालक प्रा रामेश्वर शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक केले. या क्रीडा महोत्सवाचे संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन, खजिनदार अजय ब्रम्हेचा, विश्वस्त मोहनलाल बरडिया व विश्वस्त अमित जैन यांनी कौतुक केले.