
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे सुपर अबॅकस नॅशनल विंटर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुष्कर सुपर अबॅकस अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी सुपर अबॅकसचे संचालक मनीष महाजन आणि विदर्भ विभाग प्रमुख राजेश परदेशी यांनी सुपर अबॅकसची नॅशनल विंटर चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, उद्योजक सुनील देसरडा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुष्कर सुपर अबॅकस अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थी राधिका काळे, योग गिरणार, वेद गिरणार, भक्ती राऊत या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी वेदांत कुमावत, आर्वी घोडके, अनुश्री घोडके, अनुज भाबडे, समीक्षा गीते, चैतन्य सातारकर, अमर वाघ , रिद्धीमा राठोड, कार्तिक काळे, श्रुती बसिया, अपूर्वा घाटेश्वर, दीप्ती बनसोड, सर्वज्ञ मोरे, अर्णव पायघोण, पृथ्वीराज भाबडे, श्रेयस ढेंबरे, आयुष कांबळे, वेदांत कुमावत, श्रीहरी राऊत, सहभागी विद्यार्थी व पुष्कर सुपर अबॅकस अकॅडमीच्या संचालिका वर्षा संदीप डोणे यांना प्रमुख अतिथी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.