विहान, जवेरिया, समरजीत, आरोही, ओंकार, डोंगरे, आर्यन, केतकीला विजेतेपद

  • By admin
  • February 13, 2025
  • 0
  • 110 Views
Spread the love

लातूर जिल्हा अॅथलेटिक्स स्पर्धा 

उदगीर (जि. लातूर) :  लातूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने सब ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विहान सुंकरवार, सय्यद जवेरिया, समरजीत माने, आरोही माळी, ओंकार वळसांगे, आरोही डोंगरे, आर्यन भोसले व केतकी  पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले. 

या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध शाळेतील वयोगटानुसार ८, १०, १२ व १४ वर्षांखालील मुले व मुलींचा सहभाग होता. एकूण ३४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभास संघटनेचे सहसचिव निजाम शेख, प्राचार्य डॉ राजकुमार मस्के, डॉ संतोष बिरादार, मनोज हुलसुरे, युवराज राठोड, दिगेन बिरादार, प्रा सतीश मुंढे, डॉ सचिन चामले हे उपस्थित होते.

 
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सचिव ॲड विक्रम संकाये, कार्याध्यक्ष प्रा व्ही आर हुडगे यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विविध समित्यामध्ये व पंच म्हणून डी आर मुंढे, लक्ष्मण सोनकांबळे, निहाल खान, तुळशीदास पोतने, शिवानंद पाटील, सचिन चौधरी, राहुल होनसांगळे, अंकुश मंडले, रोहन ऐनाडले, रमेश सूर्यवंशी, वीरसागर काळे, समाधान बुर्गे, साईनाथ कांबळे, सोनल उदबळे, सावन जाधव, मारुती बिरादार, जनक घोगरे, अमर सूर्यवंशी, मिथुन शिंदे, अंकित जाधव, कृष्णा केंद्रे, अरविंद पांचाळ यांनी पुढाकार घेतला होता. या स्पर्धेतील विजेते खेळाडू २३ व २४ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये लातूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

स्पर्धेचा अंतिम निकाल

८ वर्षांखालील मुले : ५० मीटर : १. विहान सुंकरवार, २. अविनाश दंडे, ३. वेदांत कोळे. १०० मीटर : १. विहान सुंकरवार, २. अविनाश दंडे, ३. अथर्व हूड. स्टॅंडिंग ब्रोड जंप : १. प्रभास किवंडे, २. ओजेस जाधव, ३. रुद्र मुसळे. 

मुलींचा गट : ५० मीटर : १. सय्यद जवेरिया मुजीब, २. प्रिया राठोड, ३. शिवानी इप्पर. १०० मीटर : १. सय्यद जवेरिया मुजीब, २. प्रिया राठोड, ३. वेदिका  भुतडा. स्टॅंडिंग ब्रोड जंप : १. प्रिया राठोड, २. सय्यद जवेरिया मुजीब.

१० वर्षांखालील मुले : ५० मीटर : १. समरजीत माने, २. रेवंश सूर्यवंशी, ३. यशवर्धन देवकट्टे. १०० मीटर : १. समरजीत माने, २. रेवंश सूर्यवंशी, ३. यशवर्धन देवकट्टे. स्टॅंडिंग ब्रोड जंप : १. रुद्रप्रताप गिरी, २. आयुष घोडके, ३. समरजीत माने.
मुलींचा गट : ५० मीटर : १. आरोही माळी, २. दुर्वा जामदोरे, ३. देविका चोले. १०० मीटर : १. स्वरा गिरी, २. आराध्या स्वामी, ३. सोनल राठोड. स्टॅंडिंग ब्रोड जंप : १. आरोही माळी, २. दुर्वा जामदोरे, ३. रिया रामटेके.

१२ वर्षांखालील मुले : ६० मीटर : १. ओंकार वळसांगे, २. शिवांश गिरी, ३. सोहम दडगे. ३०० मीटर : १. साईनाथ शिंगारे, २. समर्थ कात्रे, ३. विक्रांत दळवे. लांब उडी : १. शिवांश गिरी, २. ओंकार वळसांगे, ३. कृष्ण यगडे. गोळा फेक : १. सोहम  दासरे, २. रघुनंदन नागरगोजे, ३. शौर्य देशमुख.

मुलींचा गट : ६० मीटर : १. आरोही डोंगरे, २. हर्षदा कोळे, ३. आरोही धामणगावकर. ३०० मीटर : १. त्रजश्विने बाळाने, २. अर्ना लोया, ३. जानवी घोरपडे. लांब उडी : १. आरोही डोंगरे, २. त्रजश्विने बाळाने, ३. दुर्गा जाधव. गोळा फेक : १. आदिती गायकवाड, २. रेवा खुबा, ३. अचल पाटील.

१४ वर्षांखालील मुले : ८०  मीटर : १. आर्यन भोसले, २. आर्यन करटकर, ३. साईनाथ नरळे. ३०० मीटर : १. आर्यन भोसले, २. उत्कर्ष शिलुकर, ३. समर्थ लखुटे. लांब उडी : १. राघव सरगे, २. साईनाथ नरळे, ३. आदर्श गडकर. गोळा फेक : १. सार्थक धनशेट्टे, २. आर्यन करटकर, ३. पृथ्वीराज राठोड.

मुलींचा गट : ८० मीटर : १. केतकी पाटील, २. प्रेरणा बेलुरे, ३. सायली देशमुख. ३०० मीटर : १. प्रेरणा बेलुरे, २. इंदुमती नामवाड, ३. श्रावणी चालक. लांब उडी : १. वेदिका मलवडे, २. प्रणाली गायकवाड, ३. प्रेरणा बेलुरे. गोळा फेक : १. वेदिका मलवडे, २. नव्या हलकुडे, ३. रचना पुणेकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *