एशिया ट्रायथलॉन कपसाठी अभय देशमुख यांची नियुक्ती

  • By admin
  • February 13, 2025
  • 0
  • 127 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : चेन्नई येथे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या एशिया ट्रायथलॉन कपसाठी महानगरपालिका सिद्धार्थ जलतरण तलावाचे व्यवस्थापक आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (लेव्हल १) अभय देशमुख यांची रन चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अभय देशमुख हे वर्ल्ड ट्रायथलॉनचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी आहेत आणि त्यांनी हाँगकाँग, नेपाळ, श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये पाच वेळा आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी म्हणून आपली भूमिका बजावली आहे.

ही स्पर्धा १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणार असून झेकिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, जपान, फिलिपिन्स, इटली, नेपाळ, मलेशिया, उझबेकिस्तान, सिंगापूर, दक्षिण कोरिया यांसारख्या देशांतील महिला आणि पुरुष खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

त्यांच्या निवडीबद्दल इतर मागास कल्याण व दुग्ध विकास मंत्री आणि संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे, मनपा प्रशासक जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपआयुक्त डॉ विजय पाटील, अशोक काळे, संदीप चव्हाण, सचेंद्र शुक्ला, प्रशांत बुरांडे, डॉ सुनील देशमुख, डॉ प्रफुल्ल जटाळे, राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ दयानंद कुमार, राज्य सचिव राजेंद्र निंबाळते, डॉ संदीप जगताप, कर्मवीर लव्हेरा, अजय दाभाडे, निखिल पवार, अजयसिंग पाल यांच्यासह इतरांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *