
गतविजेता रॉयल्स चॅलेंजर्स-गुजरात जायंट्स संघात सलामीचा सामना
वडोदरा : महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा नवा हंगाम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा हा तिसरा हंगाम आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.
महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील सर्व २२ सामने हे चार शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. वडोदरा, बंगळुरू, लखनौ आणि मुंबई अशा चार शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने रंगणार आहेत. सर्व सामने हे संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ नेटवर्कद्वारे करण्यात येणार आहे. जिओ सिनेमा या वाहिनीवर देखील सामने पाहता येणार आहेत.
गेल्या दोन हंगामांप्रमाणे यावेळीही स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी समान स्वरूप असेल. पाच संघांच्या या स्पर्धेच्या गट टप्प्याच्या शेवटी जो संघ अव्वल स्थानावर राहील तो थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उर्वरित संघ अंतिम फेरीसाठी एलिमिनेटर सामने खेळतील. अशाप्रकारे स्पर्धेसाठी दोन अंतिम संघ निश्चित केले जातील.
स्पर्धेत सहभागी होणारे ५ संघ
मुंबई इंडियन्स : अमनदीप कौर, अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, जिंतीमणी कलिता, सत्यमूर्ती कीर्तन, नताली सायव्हर, पूजा वस्त्रकर, सजीवन सजना, यास्तिका भाटिया, सायका इशाक, शबनम इस्माईल, नदीन डी क्लार्क, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : डॅनी वायट-हॉज, सबिनेनी मेघना, स्मृती मानधना, आशा शोबाना, एलिस पेरी, जॉर्जिया वेअरहॅम, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, सोफी डेव्हाईन, रिचा घोष, रेणुका सिंग, एकता बिश्त, केट क्रॉस, चार्ली डीन, प्रमिला रावत, व्हीजे जोशिता, राघवी बिस्ट, जागर्वी पवार.
दिल्ली कॅपिटल्स : जेमिमा रॉड्रिग्ज, मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, स्नेहा दीप्ती, अॅलिस कॅप्सी, अॅनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, मॅरिझाने कॅप, मिन्नू मणी, राधा यादव, शिखा पांडे, तानिया भाटिया, तितस साधू, श्री चरणी, नंदिनी कश्यप, सारा ब्राइस, निक्की प्रसाद.
गुजरात जायंट्स : भारती फुलमाळी, लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफिल्ड, प्रिया मिश्रा, अॅशले गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, सायली सतघरे, तनुजा कंवर, बेथ मुनी, शबनम शकील, मन्नत कश्यप, मेघना सिंग, काशवी गौतम, डिएंड्रा डॉटिन, सिमरन शेख, डॅनिएल गिब्सन, प्रकाशिका नाईक.
यूपी वॉरियर्स : किरण नवगिरे, श्वेता सहरावत, वृंदा दिनेश, चामारी अथापथू, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, तहलिया मॅकग्रा, उमा छेत्री, एलिसा हिली, साईमा ठाकोर, गौहर सुलताना, अंजली सरवानी.