
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने सन २०२४-२५ सालची पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा १३ ते १६ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशनचे पुरुष व महिला असे दोन्हीही संघ सहभागी होणार आहेत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता जिल्हा परिषद मैदान, औरंगपुरा या ठिकाणी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंनी सोबत आधार कार्ड आणावे.
निवड समिती सदस्य म्हणून दीपक सपकाळ, शुभम सुरळे, राहुल नाईकनवरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी श्रीपाद लोहकरे (९०९६६२५९११), उमेश साबळे (७६२०४२९९९२) यांच्याशी संपर्क साधावा.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी नोंदवावा असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा खो-खो असोसिएशन अध्यक्ष समीर मुळे, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन खजिनदार गोविंद शर्मा, जिल्हा खो-खो असोसिएशन सचिव विकास सूर्यवंशी यांनी केले आहे.
Kho kho