महाराष्ट्र, चंदीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड संघांची आगेकूच

  • By admin
  • February 13, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, चंदीगड, पंजाब, दिल्ली, राजस्थान व छ्त्तीसगड या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली आहे.

भारतीय क्रीडा महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य व छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहाय्याने ६८ व्या राष्ट्रीय १४ वर्षांखालील मुले व मुलींची सॉफ्टबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, महाराष्ट्र राज्य संघटना सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, जीएसटी अधिकारी शरद देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, भारतीय क्रीडा महासंघाचे स्पर्धा निरीक्षक अनिल मिश्रा, किशोर चौधरी, दिल्ली सॉफ्टबॉलचे सचिव विजय गौड, भारतीय सॉफ्टबॉल संघाचे चेअरमन शाकीर अली, रायझिंग स्टार स्कूलच्या मुख्याध्यापिका दिपाली वाकळे, उपमुख्याध्यापक संदीप चव्हाण, जम्मू-काश्मीरचे न्यायालयीन कमिशनर अंशू चौधरी, राजस्थान सॉफ्टबॉलचे कोषाध्यक्ष सुबोध मिश्रा, मृत्युंजय शर्मा, संजय बाबर, क्रीडा अधिकारी लता लोंढे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, मंगेश गुडदे, राम मयांदे, खंडूराव यादव, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, सदानंद सवळे, दीपक रुईकर, बाजीराव भुतेकर,गणेश बेटूदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव गोकुळ तांदळे यांनी केले. राकेश खैरनार यांनी आभार मानले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रमाता इंदिरा गांधीच्या सैनिकी स्कूलच्या ड्रिल ट्रूपने सुरेख पथसंचलन केले. आर्य चाणक्य विद्याधामच्या खेळाडूंनी चित्तथरारक मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केले.

मुलांच्या अ गटात छत्तीसगड, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली तर ब गटात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा, राजस्थान या संघांचा समावेश आहे. क गटात सीबीएससी, छत्तीसगड, विद्याभारती, पाँडेचेरी, चंदीगड तर ड गटात पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, बिहार, तेलंगाना या संघांचा समावेश आहे. मुलींच्या अ गटात छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, चंदीगड, तेलंगाना, ब गटात राजस्थान, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, क गटात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बिहार, पंजाब आणि ड गटात मध्यप्रदेश, विद्याभारती, हरियाणा, सीबीएससी या संघांचा समावेश आहे.

सामन्यांसाठी पंच प्रमुख अक्षय येवले, स्वप्नील चांदेकर, आकाश सराफ, विकास वानखेडे, संतोष आवचार, रोहित तुपारे, भीमा मोरे, प्रीतीश पाटील, सतीश राठोड, प्रवीण गडख, अंकुश काळबांडे इत्यादींनी पंच म्हणून काम पाहिले. गुणलेखक म्हणून ईश्वरी शिंदे, ईश्वरी चव्हाण, दीक्षा शिनगारे आदींनी भूमिका निभावली.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रफीक जमादार, पांडुरंग कदम, किशोर चव्हाण, अनिल दांडगे, सीमा खोब्रागडे, गणपत पवार, भालेराव, रमेश कवडे, यश थोरात, गौरव साळवे, निखिल वाघमारे, श्रवण शिटे, विशाल जहारवाल, दीपक भवर, कार्तिक तांबे आदींनी परिश्रम घेत आहेत.

गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये अमन (दिल्ली), मृणाली पवार, मनाली खोत, शंतनू धायगुडे, सर्वेश शेळके (महाराष्ट्र), प्रियंका रावल (राजस्थान) या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

महत्त्वाच्या सामन्यांचे निकाल

मुलांचा विभाग : चंदीगड विजयी विरुद्ध पाँडिचेरी (९-०) होमरन, पंजाब विजयी विरुद्ध बिहार (१०-०) होमरन, दिल्ली विजयी विरुद्ध गुजरात (६-१) होमरन, चंदीगड विजयी विरुद्ध तामिळनाडू (१२-०) होमरन, राजस्थान विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश (१२-०) होमरन, चंदीगड विजयी विरुद्ध गुजरात (१०-०) होमरन.

मुलींचा विभाग : दिल्ली विजयी विरुद्ध गुजरात (१०-०) होमरन, महाराष्ट्र विजयी विरुद्ध बिहार (१०-०) होमरन, चंदीगड विजयी विरुद्ध तेलंगणा (१०-०) होमरन, पंजाब विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश (४-३) होमरन.
5) छत्तीसगड वि.वी जम्मू काश्मीर(10-0) होमरन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *