महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा

  • By admin
  • February 14, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

पुण्याची रेखा सावंत कर्णधार 

मुंबई : आगामी ७१व्या महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला संघ जाहीर करण्यात आला आहे. पुण्याची स्टार खेळाडू रेखा सावंत हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १५ ते १८ फेब्रुवारी  दरम्यान हरियाणाच्या मोरमाजरा, कर्नाल येथील आर्य कन्या गुरुकुलच्या बंदिस्त क्रीडा संकुलात होणार आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेतूनच भारताच्या महिला कबड्डी संघाची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या संघाला इराण येथे होणाऱ्या आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. राज्य संघटनेचे सचिव बाबुराव चांदेरे यांनी अधिकृत पत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्राचा महिला संघ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राची टीम  

महिला संघ : रेखा सावंत (कर्णधार), आम्रपाली गलांडे, मंदिरा कोमकर, सलोनी गजमल, समरिन बुरोंडकर, तसलीम बुरोंडकर, पूजा यादव, प्रणाली नागदेवते, माधुरी गवंडी, ज्युली मिस्किटा, निकिता पडवळ, दिव्या गोगावले. प्रशिक्षक: संतोष शिर्के, व्यवस्थापिका: सोनाली जाधव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *