
जिनियस चेस अकादमीतर्फे आयोजन
नाशिक : शिवजयंती निमित्त १९ फेब्रुवारी रोजी नाशिक येथील सिटी सेंटर मॉल येथे भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिनिअस चेस अकादमीतर्फे (नाशिक) बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ओपन गटात होणार आहे. विजेत्यांना प्रथम ५ हजार रुपये, द्वितीय ३ हजार रुपये, तृतीय २ हजार रुपये, चतुर्थ १ हजार रुपये, पाचवा क्रमांक १ हजार रुपये अशी रोख पारितोषिके व सर्वांना ट्रॉफी दिली जाणार आहे. तसेच सहा ते पंधरा क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिनियस चेस अकादमीचे मुख्य संचालक व राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक ओंकार जाध यांनी दिली.
या स्पर्धेत बेस्ट अनरेटेड १ ते ५ क्रमाक मिळवणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी, सात वर्षांखालील ३ मुले व मुलींना ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच अंडर ९, १२, १५ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात प्रत्येकी तीन ट्रॉफी देण्यात येणार असल्याचे संयोजक ओंकार जाधव यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी २०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सागर सुरवाडे (7276076007) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच https://forms.gle/qhyxBWgd1vAkn8JW8 या लिंकवर खेळाडू नाव नोंदणी करू शकतील. नाशिक येथील सिटी सेंटर मॉल या ठिकाणी १९ तारखेला सकाळी ११.३० वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. खेळाडूंनी शक्य असल्यास मराठी वेशभूषेत यावे. अधिक माहितीसाठी 9272103185 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक ओंकार जाधव यांनी केले आहे.