टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी कर्नाटकचे नागेश्वर राव

  • By admin
  • February 14, 2025
  • 0
  • 62 Views
Spread the love

महाराष्ट्राचे रणजीत चामले यांची सरचिटणीसपदी निवड 

परभणी : टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कर्नाटकचे नागेश्वर राव आणि सरचिटणीपदी महाराष्ट्राचे रणजीत चामले यांची निवड करण्यात आली आहे. 

पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया या संघाटनेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमेश शेलार यांनी काम पाहिले. भारतातील २० राज्यांचे ४० प्रतिनिधी हजर होते. प्रत्येक राज्य संघटनेचे दोन प्रतिनिधींना मतदार करण्याचा अधिकार होता. मागील ४ वर्षांची मुदत संपल्यामुळे घटनेप्रमाणे निवडणूक घेणे बंधनकारक होते. सर्व सहमतीने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

क्रीडा मंत्रालयाच्या आदेशाने नोडल अधिकारी म्हणून संस्थापक डॉ व्यंकटेश वांगवाड यांची नेमणूक करण्यात आली होती. कार्यकारिणी निवड संपल्यावर मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष आनंद खरे व डॉ रितेश वांगवाड यांनी नवीन निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच निवडणूक अधिकारी रमेश शेलार यांनीही नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. डॉ व्यंकटेश वांगवाड यांनी नवीन कार्यकारिणीला संबोधित करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

नवीन कार्यकारिणीने कार्यभार स्वीकारल्यानंतर उप समित्यांवरील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. विकास समिती अध्यक्ष सुरेश रेड्डी, डिसिप्लीन समिती धमेद्रसिंह जडेजा, महिला समिती, खेळाडू कल्याण समिती, तांत्रिक समिती, पंच समिती, कार्यक्रम समिती, प्रसिद्धी समिती स्थापन करण्यात आली. माजी सचिव डॉ रितेश वांगवाड यांनी आभार मानले. 

नूतन कार्यकारिणी

अध्यक्ष : नागेश्वर राव (कर्नाटक), सरचिटणीस : रणजित चामले (पुणे), कोषाध्यक्ष : तृषाली बारिया (गुजरात), उपाध्यक्ष : प्रियानंदा एन (मणिपूर), प्रतापसिंह (गुजरात), शशिकांता नायक (ओडिशा), सहसचिव एस सांबा शिवा राव (आंध्र प्रदेश), सुरेश रेड्डी (महाराष्ट्र), ब्रजेश प्रसाद (झारखंड), प्रदीप केशवानी (मध्य प्रदेश). सदस्य : निहारिका सियात (गुजरात), आर विजय (तामिळनाडू), जयशंकर गुप्ता (बिहार), जी जी एस. वाराप्रसाद (तेलंगणा), निकिता (दिल्ली), सुषमा राय (कर्नाटक), जॉन ॲम्ब्रोस (पाँडिचेरी), वंदना कुमारी (बिहार).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *