यजमान महाराष्ट्रासह, छत्तीसगड, तेलंगणा, पंजाब राजस्थान संघांची आगेकूच

  • By admin
  • February 14, 2025
  • 0
  • 34 Views
Spread the love

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा 

छत्रपती संभाजीनगर : ६८व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघासह छत्तीसगड, तेलंगणा, पंजाब या संघांनी विजय नोंदवत आगेकूच कायम ठेवली आहे.

भारतीय क्रीडा महासंघ आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद तसेच महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटना व छत्रपती संभाजीनगर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहाय्याने ६८वी राष्ट्रीय १४ वर्षांखालील मुले-मुलींची सॉफ्टबॉल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुलात रंगतदार होत आहे. 

स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात संघांना शुभेच्छा देण्यासाठी आर्मी ऑफिसर विष्णू बढे, चंद्रकांत खरात, संदीप ढोणे, भारतीय शालेय क्रीडा महासंघाचे अधिकारी अनिल मिश्रा, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई हे उपस्थित होते. दुपारच्या सत्रात विभागीय वन अधिकारी प्रमिला मोरे, वन अधिकारी कैलास जाधव,  ज्युडीशियल कमिशनर अजमेरचे अंशू चौधरी, विजय गौड, मृत्युंजय शर्मा, बाबर सर, पाटील सर, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी किशोर चौधरी, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ प्रदीप तळवेलकर, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 शुक्रवारी झालेल्या सामन्यांमध्ये निवास पुपला, निहाल चंद्र मरकती, कुस्ता पुरम, अहलिया, चिकल श्रीवर्षानी (तेलंगणा),तुशिता सराफ, अस्मी राऊत (महाराष्ट्र), रोहन काकडे, शिवराज बोराडे (विद्याभारती) या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

या सामन्यांसाठी पंच प्रमुख अक्षय येवले, स्वप्नील चांदेकर, आकाश सराफ, विकास वानखेडे, संतोष आवचार, रोहित तुपारे, भीमा मोरे, प्रीतीश पाटील, सतीश राठोड, प्रवीण गडख, अंकुश काळबांडे आदींनी पंच म्हणून काम पाहिले. गुणलेखक म्हणून ईश्वरी शिंदे, ईश्वरी चव्हाण, दीक्षा शिनगारे आदींनी भूमिका निभावली.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रफीक जमदार, पांडुरंग कदम, किशोर चव्हाण, अनिल दांडगे, सीमा खोब्रागडे, होण्णा सर, गणपत पवार, श्यामसुंदर भालेराव, रमेश कवडे, यश थोरात, गौरव साळवे, निखिल वाघमारे, श्रवण शिटे, विशाल जहारवाल, दीपक भवर, कार्तिक तांबे यांच्यासह राज्य संघटना पदाधिकारी व छत्रपती संभाजीनगर जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
          
आर्य चाणक्य विद्याधामचे ११ खेळाडू पहिल्यांदाच सहभागी

छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिल्यांदा विद्याभारती कडून आर्य चाणक्य विद्याधाम जटवाडा शाळेचा संघ सहभागी झाला आहे. या संघातील खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे कार्यवाह वामनराव देशपांडे, विश्वस्त रमेश पोखर्णा, मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी, उपमुख्याध्यापक शिवकुमार यन्नावार, मदन तसेवाल, पार्थ बेरा, किशोर चव्हाण, यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
 
या स्पर्धेत आर्य चाणक्य विद्याधामचे खेळाडू शिवराज बोराडे, रोहन काकडे, वंशराज वाघ, हरिओम, सुजित राठोड, सार्थक तुपे, चेतन निरपळ, विराज बोराडे, पृथ्वीराज बोराडे, वेदांत बोराडे, सुमित पारवे असे अकरा खेळाडू विद्याभारतीतर्फे राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या संघाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. गणेश बेटुदे आणि संघ व्यवस्थापक म्हणून पांडुरंग कदम हे काम पाहात आहेत.


स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यांचे निकाल

मुलांचा विभाग : राजस्थान विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश (१२-०) होमरन, तेलंगणा विजयी विरुद्ध जम्मू काश्मीर (११-१) होमरन, पंजाब विजयी विरुद्ध बिहार (१०-०) होमरन, छत्तीसगड विजयी विरुद्ध गुजरात (१०-०) होमरन, महाराष्ट्र विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश (५-०) होमरन, जम्मू काश्मीर विजयी विरुद्ध बिहार (४-१) होमरन, हरियाणा विजयी विरुद्ध राजस्थान (४-१) होमरन, चंदीगड विजयी विरुद्ध पाँडिचेरी (९-०) होमरन.

मुलींचा विभाग : राजस्थान विजयी विरुद्ध गुजरात  (१३-२) होमरन, पंजाब विजयी विरुद्ध बिहार (८-१) होमरन, हरियाणा विजयी विरुद्ध सीबीएससी (३-२) होमरन, राजस्थान विजयी विरुद्ध दिल्ली (४-०) होमरन, हरियाणा विजयी विरुद्ध मध्य प्रदेश (११-०) होमरन, महाराष्ट्र विजयी विरुद्ध आंध्र प्रदेश (७-१) होमरन, दिल्ली विजयी विरुद्ध तामिळनाडू (७-१) होमरन, तेलंगणा विजयी विरुद्ध जम्मू काश्मीर (३-१), तेलंगणा विजयी विरुद्ध दिल्ली (७-०) होमरन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *