
अष्टपैलू दर्शन नळकांडेचा समावेश
नागपूर : नागपूर येथे १७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विदर्भ संघाचा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत मुंबई संघाशी सामना होणार आहे. या सामन्यासाठी विदर्भ संघ जाहीर करण्यात आला आहे. अष्टपैलू दर्शन नळकांडे याचा समावेश करण्यात आला आहे.
रणजी करंडक उपांत्य सामन्यात मुंबईविरुद्ध खेळणाऱ्या विदर्भाच्या १७ सदस्यीय संघात एक बदल करण्यात आला आहे. व्हीसीएच्या वरिष्ठ निवड समितीने शुभम कापसेच्या जागी अष्टपैलू दर्शन नळकांडेचा समावेश केला आहे. शुभम कापसे तंदुरुस्त नसल्याने हा एकमेव बदल करण्यात आला आहे.
विदर्भ संघात अक्षय वाडकर (कर्णधार), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वखारे, आदित्य ठाकरे, दर्शन नळकांडे, नचिकेत भुते, सिद्धेश वाठ, यश ठाकूर, डॅनिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शोरे या खेळाडूंचा समावेश आहे.