
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या माजी अधिष्ठाता आणि अजित सीड्स प्राइवेट लिमिटेड संचलित सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन अविनाश येळीकर यांना असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीतर्फे प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच मानद संस्थापक फेलो म्हणून सन्मानित करून दरवर्षी राज्य परिषदेत बीजभाषण डॉ कानन येळीकर यांच्या नावाने केले जाणार आहे.
सोलापूर येथील डॉ अंजली चिटणीस व छत्रपती संभाजीनगर येथील डॉ कानन येळीकर यांच्या आरोग्य क्षेत्रातील कार्याचा गौरव म्हणून या राज्यस्तरीय पुरस्काराने व्हॅन कन्व्हेन्शन सेंटर चंद्रपूर येथे आयोजित समारंभात गौरवले गेले आहे. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, अजित सीडसचे व्यवस्थापकीय संचालक समीर मुळे, सीएसएमएसएस महाविद्यालय आणि रुग्णालय संचालिका स्नेहल मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वैद्यकीय शिक्षक म्हणून केलेल्या कामाबद्दल त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील मानाचा असलेला डॉ बी सी रॉय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या यापुर्वीच सन्मानित करण्यात आले असून आदर्श वैद्यकीय शिक्षकांसह राज्य शासन आणि नामांकित संस्था, संघटनांकडून विविध पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. आता दरवर्षी राज्य संमेलनात डॉ कानन येळीकर यांच्या नावाने बीजभाषण होणार आहे. हाही त्यांच्यासाठी लाईफटाईम सन्मान असणार आहे.