
कोल्हापूर : कोल्हापूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत केंद्रीय विद्यालय सदन कमांड पुणे येथे सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या वृंदा वाणी हिने चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.
राष्ट्रीय स्तरावर १ सुवर्ण, ३ कांस्य पदके तर राज्यस्तरीय स्पर्धेत १ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदके वृंदाने पटकावली आहेत. या शानदार यशाबद्दल वृंदावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शेखर खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली वृंदा वाणी ही नियमित सराव करीत आहे.