
पुणे : सांगली येथे सुरू असलेल्या जी के पवार ट्रॉफी अंडर १३ क्रिकेट स्पर्धेत सांगोला येथील आनंद शेंडे याने दहा विकेट घेऊन सामना गाजवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सुमित स्पोर्ट क्रिकेट अकॅडमी सांगली संघाकडून खेळताना सागर आवटी क्रिकेट अकॅडमीच्या विरोधात आनंद शेंडे याने एका डावात १० बळी घेतले. आनंद हा अंडर १४ हिंगोली जिल्हा क्रिकेट संघाकडून इन्व्हिटेशन खेळत आहे. यावर्षी त्याने अंडर १४ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा कॅम्प केला आहे व तो सांगोला येथे राजमाता क्रिकेट अकॅडमी मध्ये मागील ४ वर्षांपासून सराव करत आहे. आनंदला प्रशिक्षक प्रशांत काशीद, रणजीत गवळी, अक्षय जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.