शिवजयंतीनिमित्त बुधवारी स्केटिंग, सायकलिंग, रनिंग स्पर्धेचे आयोजन

  • By admin
  • February 15, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

सचिव भिकन अंबे यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्केटिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा तीन स्पर्धेचे आयोजन १९ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.

रोलर रिले स्केटिंग असोसिएशन छत्रपती संभाजीनगर व साईपुजा ट्रॉफी शॉप, चाटे स्कूल, बीड बायपास यांच्या संयुक्त विद्यमाने स्केटिंग, सायकलिंग व रनिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. चाटे स्कूल येथील ४०० मीटर ट्रॅकवर ही स्पर्धा घेण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे सचिव भिकन अंबे यांनी दिली.

चार वर्षांखालील, ४-६, ६-८, ८-१०, १०-१२, १२-१४ व खुला गट अशा विविध वयोगटात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक वयोगटातील प्रथम तीन खेळाडूंना छत्रपती चषक मेडल, ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच सहभागी खेळाडूंना मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती सचिव भिकन अंबे यांनी दिली.

१९ फेब्रुवारी रोजी चाटे स्कूल, बीड बायपास, सातारा परिसर येथे स्केटिंग स्पर्धा सकाळी ९ वाजता, सायकलिंग स्पर्धा सकाळी १० वाजता आणि रनिंग स्पर्धा सकाळी ११ वाजता होणार आहे. अधिक माहितीसाठी ९४००००३३१९, ९१६८४३०००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सचिव भिकन अंबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *