
मनमाड : अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत वीणा आहेर हिने शानदार कामगिरी नोंदवत कांस्यपदक पटकावले.
भारतीय विश्व विद्यालय महासंघ व हिमाचल प्रदेश केंद्रीय विश्वविद्यालय धर्मशाला आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या वीणा संतोष आहेर हिने ४५ किलो वजनी गटात ल्यामरीन टेक स्किल्स विद्यापीठ पंजाब विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत ६३ किलो स्नॅच ८१ किलो क्लीन जर्क १४४ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत कांस्यपदक पटकावले.
४५ किलो वजनी गटात भारतातील विविध विद्यापीठातील २९ खेळाडूंनी सहभागी झाले होते.
वीणा आहेर हिला छत्रे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने आणि अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.