
नवी दिल्ली : सॉफ्टबॉल हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असूनही सॉफ्टबॉल खेळ व खेळाडूंवर अन्याय होत असल्याची भावना सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश मेंडोला, सचिव डॉ प्रवीण अनावकर, एल आर मौर्य यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे थेट व्यक्त केली. या भेटीत सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाने अमरावती येथे होणाऱ्या ४६व्या सीनियर राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांना निमंत्रित केले.
या भेटीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सॉफ्टबॉल हा खेळ ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असूनही साई एक्सलंस सेंटर, खेलो इंडिया, भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्यातील राजकारणामुळे सॉफ्टबॉल खेळावर अन्याय होत असल्याचे सांगितले. त्यावर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.