
लिजंड्स प्रीमियर लीग : कर्णधार मयूर अग्रवाल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर : लिजंड्स प्रीमियर लीग सिझन ३ टी २० क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्लोक वॉरियर्स संघाने साई श्रद्धा संघावर सात गडी राखून मोठा विजय नोंदवला. या सामन्यात मयूर अग्रवाल याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

एमआयटी क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. साई श्रद्धा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १९.४ षटकात सर्वबाद ११८ असे माफक लक्ष्य उभे केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्लोक वॉरियर्स संघाने १६.१ षटकात तीन बाद १२२ धावा फटकावत हा सामना सात गडी राखून जिंकला.
या सामन्यात श्लोक वॉरियर्स संघाचा कर्णधार मयूर अग्रवाल याने केवळ ५२ चेंडूत ७१ धावांची वादळी खेळी साकारली. मयूर याने आक्रमक अर्धशतक ठोकताना दोन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. डॉ महामुनी याने ३९ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. त्याने एक षटकार व एक चौकार मारला. आकाश अभंग याने ३१ चेंडूत २७ धावा फटकावल्या. आकाश याने चार चौकार मारले.

गोलंदाजीत जेके याने ११ धावांत तीन गडी बाद करुन आपला ठसा उमटवला. वहाब याने १६ धावांत दोन गडी बाद केले. अनिरुद्ध पुजारी याने २७ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : साई श्रद्धा संघ : १९.४ षटकात सर्वबाद ११८ (डॉ महामुनी ३४, आकाश अभंग २७, अमित पाठक १२, निखिल मुरुमकर नाबाद २२, मनोज चोबे ६, जेके ३-११, वहाब २-१६, अनिरुद्ध पुजारी २-२७, मयूर अग्रवाल १-१०, आमेर बदाम १-३१) पराभूत विरुद्ध श्लोक वॉरियर्स संघ : १६.१ षटकात तीन बाद १२२ (मयूर अग्रवाल ७१, अनंत नेरळकर १९, ज्ञानेश्वर पाटील नाबाद १९, प्रवीण क्षीरसागर नाबाद १, अमित पाठक १-११, डॉ कपिल पल्लोड १-२५, निखिल मुरुमकर १-२). सामनावीर : मयूर अग्रवाल.