
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे कार्यरत असलेल्या डॉ यशश्री करमाळकर यांना ‘चेन टू बॉलीवूड’ या म्युझिक कंपनीकडून हॉलीवूडच्या शॉर्ट फिल्ममध्ये पार्श्वगायनाची संधी मिळाली आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त त्यांचा परिचय म्युझिशियन अमित निर्मल यांनी गायनातील गोडी व त्यासाठी गांभीर्याने सतत रियाज करत असल्याचे पाहून निर्मल यांनी त्यांना ‘चेन टू बॉलीवूड’ ही लिंक शेअर केली. डॉ यशश्री करमाळकर यांनी तयारी सुरू करून स्पर्धेत भाग घेतला. यात वयाची निकष नव्हता. १८ वर्षांखालील स्पर्धक व १८ ते त्या पुढील वयाचे गायक यात सहभाग घेऊ शकत होते. ऑनलाईन ऑडिशन्सची मोठी मालिका डॉ यशश्री करमाळकर यांनी १६२ देशांतून ऑडीशन्स होऊन पहिल्या फेरीत ५५ हजार स्पर्धक होते. त्यानंतर ७००० असे करत करत पहिली, दुसरी, तिसरी अशा सगळ्या फेऱ्या त्यानी पार केल्या. दर आठवड्यात नवी आव्हानं दिली जात होती. एप्रिलपासून ऑनलाईन सुरू असलेली ही स्पर्धा ६ ऑक्टोबरला प्रत्यक्ष रेकॉर्डींगपर्यंत येऊन ठेपली.
अंतिम स्पर्धा मुंबईत घेण्यात आली, तेव्हा त्यात ३५ स्पर्धक होते. स्पर्धकांना ओरिजनल लिरिक्स ट्यूनसह ८ दिवस आधी देण्यात आले. ओरिजनल लिरिक्सच्या रेकॉर्डींगनंतर मुंबईतच बूट कॅम्प घेतला गेला. त्यात स्वत:च्या गाण्याचे सादरीकरण (प्रेझेंटेशन) ग्रुमिंग, मार्केंटींगचे तंत्र आदी बाबी पॉलिशिंगसाठी शिकवण्यात आल्या. प्रशिक्षणानंतर पुन्हा एक ओरिजनल गाणे देण्यात आले. याच्या सरावासाठी जेमतेम तासाभराचा अवधी देण्यात आला होता. सरावानंतर ४० मिनिटात रेकॉर्डींग झाले. ई २४ या वाहिनीव ८ फेब्रुवारीला ग्रँड फिनाले प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये फायनल १६ स्पर्धकांमधून ५ विजेते निवडण्यात आले होते. त्यात डॉ यशश्री करमाळकर यांनी ऋषिकेश देसाई यांचे ओरिजनल गीत गायले होते.
लहानपणी संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी पालक अनुकूल नव्हते. परंतु पती डॉ उमाकांत करमाळकर हे ऑर्थोपेडीक सर्जन असून त्यांच्या व कुटुंबाच्या सहकार्याने आज व्यावसायिक संगीत क्षेत्रात त्यांनी दीर्घकाळ प्रयत्न करून मोठे यश संपादन केले आहे.
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीकांत देशमुख, उपप्राचार्य डॉ जयश्री देशमुख, मानव संसाधन अधिकारी अशोक आहेर, जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील, डॉ उमाकांत करमाळकर यांनी अभिनंदन केले.